raj thackrey meet babasahaeb purandare in pune | Sarkarnama

मनसेचा बदलेला झेंडा दाखवून राज यांनी घेतले बाबासाहेबांचे आशीर्वाद 

महेश जगताप 
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा बदललेला झेंडा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दाखवून पुण्यामध्ये आज त्यांचे आशीर्वाद घेतले.यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांना हा नवीन भगवा रंग व त्यावर घेतलेली राजमुद्रा असा झेंडा त्यांना आवडला व त्यांनी राज ठाकरे यांना राजकारणात यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद दिले. 

ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा बदललेला झेंडा व आपल्या राजकारणाची वाटचाल प्रखर हिंदुत्वाकडे केल्याने त्या पार्श्वभूमीवर भेट महत्वाची मानण्यात येते आहे . 

राज ठाकरे एका कार्यक्रमानिमित्त आज पुण्यामध्ये आले होते . यावेळी त्यांनी प्रथम सकाळी साडेअकरा वाजता बाबासाहेब पुरंदरे यांची पर्वती येथे राहत्या घरी भेट घेतली.नंतर त्यांच्या हस्ते दगडूशेठ यांची आरती करण्यात आली. ठाकरे नेहमीच पुण्यात आल्यानंतर पुरंदरे यांची भेट घेतात. यावेळी त्यांनी पुरंदरे यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली.  
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख