RAJ THACKREY GETS INVITATION AFTER 4 YEARS | Sarkarnama

मनसेच्या एकमेव आमदाराच्या मतदारसंघात राज ठाकरेंना चार वर्षांनी निमंत्रण

गणेश कोरे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पहिल्यांदाच तालुक्यात येण्याचे निमंत्रण दिले आहे. निमित्त आहे ओतूर येथे उभारण्यात आलेल्या इनडोअर कुस्ती स्टेडिअमचे. शेटवच्या श्रावणी सोमवारी (ता.३ सप्टेंबर) या स्टेडिअमचे उद्घघाटन करण्याचे नियोजित आहे. मात्र या कार्यक्रमाला ठाकरे येणार का, हे गुलदस्त्यात असले तरी, कार्यकर्त्यांनी फेसबुकवर निमंत्रणाची छायाचित्रे अपलोड करुन प्रचार सुरू केला आहे. 

या निमित्ताने तालुक्यातील राजकारण ढवळुन निघणार आहे. शरद सोनवणे हे आगामी निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना की मनसेकडून लढणार याबाबत चर्चां झडत असतात.  उद्घघाटनाच्या निमित्ताने राज ठाकरे आलेच तर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्याच निवडणुकीत १३ आमदार विजयी झाले हाेते. मात्र यानंतर २१०४ ला झालेल्या विधानसभेत निवडणुकीत मोदी लाटेत मनसेचा एकमेव शिलेदार शरद सोनवणे हे जुन्नरमधुन विजयी झाले. एकच आमदार विजयी झाल्यानंतर निराश झालेल्या राज ठाकरे यांनी सोनवणे यांना वाऱ्यावर सोडून दिल्याची चर्चा होती. यानंतर सोनवणे हे भाजपाच्या गोटात दाखल झाल्याबद्दल बोलले जाऊ लागले.  

सोनवणे यांनी दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह शिवसेनेच्या विविध खासदारांच्या भेटी घेतल्या होत्या. यावेळी सोनवणे शिवसेना प्रवेशाची साखऱपेरणी करत असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली होती. मात्र मी मनसेचाच असून, मनसेकडुनच निवडणुक लढणार असे सांगत, शिवरायांच्या गनिमी काव्याचा मी शिलेदार आहे, असे वक्तव्य करुन गुगलीही टाकली होती.

यानंतर पुणे शहरात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सोनवणे यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमधुनच आगामी निवडणुक लढणार असे जाहीर केले होते.  त्यानुसार आता थेट राज ठाकरे यांनाच विकासकामांच्या उद्घघाटनांचे आमंत्रण देऊन सोनवणे यांनी आपण पुन्हा मनसेच्या जवळ जात असल्याचे दाखवून दिले आहे. सोनवणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे नारायणगाव येथे प्रचाराला चार वर्षांपूर्वी आले होते. त्या आधी मनसेचे २०१४ मधील लोकसभेचे उमेदवार अशोक खांडेभराड यांच्यासाठी जुन्नर येथे सभा घेतली होती. तब्बल चार वर्षानंतर राज यांना जुन्नर मतदारसंघात येण्याचे निमंत्रण मिळाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख