raj thackrey afraid hindi | Sarkarnama

राज ठाकरे जेव्हा हिंदीतून बाईट देण्यात घाबरतात 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पुणे : अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्साहाने माध्यमांशी संवाद साधत न्यायालयाच्या निकालाचे कौतुक केले; नेहमीप्रमाणे राज यांनी आपल्या शैलीत मराठीत "टीव्ही'च्या प्रतिनिधींना आपली प्रतिक्रिया दिली,

परंतु, हिंदीत "बाइट नेण्यास राज हे घाबरले. "मराठीत ठीक आहे, पण हिंदीत बोलताना शब्दांची जुळवाजुळव करावी लागते, ''असे सांगत हिंदीतून बोलण्याआधीच माघार घेत कॅमेऱ्यापासून दूर झाले. 

पुण्यातल्या एका कार्यक्रमानंतर बोलताताना ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले. न्यायालयाचा निकाल चांगला आहे. राम मंदिर लवकरात लवकर व्हावे. त्याचबरोबर रामराज्य यावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. हा निकाल ऐकण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हवे होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

न्यायालयाचा निकाल समजल्यानंतर सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. राज ठाकरे यांनीदेखील उत्साहाने प्रतिक्रिया दिली. न्यायालयीन लढ्यात तसेत एकुणच राम मंदिराच्या लढ्याला मिळालेल्या यशात सर्वांचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात गेल्या 15 दिवसांपासून सत्तानाट्य सुरू आहे. या संदर्भात विचारले असता, ठाकरे यांनी बोलण्याचे टाळले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ठाकरे शिवसेना-भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली होती. मात्र, गेल्या 15 दिवसातील घडामोडीवर त्यांनी बोलण्याचे जाणीवपूर्वक टाळले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख