"लाव रे तो व्हिडीओ' वाले पुन्हा मैदानात, उद्या पुण्याच्या दौऱ्यावर

"लाव रे तो व्हिडीओ' वाले पुन्हा मैदानात, उद्या पुण्याच्या दौऱ्यावर

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा यांना लक्ष्य करीत " लाव रे तो व्हिडिओ ' म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधनारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकादा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. ते उद्या (शनिवारी) पुण्याचा दौरा करणार आहेत. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यांनी राज्यात दहा ठिकाणी सभा घेतल्या होत्या. या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला मात्र दोन्ही कॉंग्रेसच्या उमेदवारांना याचा फायदा झाला नाही. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेला दणदणीत यश मिळाले. त्यामुळे राज ठाकरेंना ट्रोल करण्यात आले होते. लाव रे तो व्हिडीओची खिल्लीही उडविण्यात आली होती. स्वत: उद्धव ठाकरेंनीही मनसेवर टीका केली होती. 

लोकसभेपाठोपाठ आता राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मनसेला आघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर राज यांनी काल ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीपाठोपाठ आज कॉंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी राज यांनी भेट घेतली आहे. आता राज पुन्हा मुंबईबाहेर पडले आहेत. उद्या पुण्यात ते मनसेच्या कार्यकर्त्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com