राज ठाकरेंनी दीड मिनिटांतच मने जिंकली...

...
राज ठाकरेंनी दीड मिनिटांतच मने जिंकली...

पुणे : कुंचल्यांच्या दुनियेत आलो, ते शिक्षण सोडून. म्हणून माझ्याकडं तशी शैक्षणिक "डिग्री' नाही, ती आहे की नाही ? हेही कुणी कधी विचारलंही नाही,' अशी कुबली देत शिक्षणापेक्षा आपण व्यंगचित्रांच्या दुनियेत "राज्य' करीत असल्याचेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी पुणेकरांच्या निदर्शनास आणून दिले.

तेव्हाच, या कार्यक्रमात एका व्यंगचित्रकाराचं भाषण ऐकलेल्या राज यांनी त्यांना "मनसे'त येण्याची साद घातली आणि राज यांनी हिशा पिकवला. 

झील इन्स्टिटयूट पुणे आणि कार्टुनिस्ट कंबाईन यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजिलेल्या व्यंगचित्र कार्यशाळेचे उदघाटन राज यांच्या हस्ते झाले आणि आणि विद्यार्थ्यांसह व्यंगचित्रकारांना त्यांनी "धडे दिले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस,चारुहास पंडित, जयेश काटकर आदी यावेळी उपस्थितीत होते. आपल्या आवडीच्या म्हणजे, क्षेत्रातील कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या राज यांनी राजकारणापेक्षा कलेबाबत आपली भूमिका मांडली आणि राजकीय सभांप्रमाणे दीड मिनिटांच्या भाषणातच हा कार्यक्रमही जिंकला. विशेष म्हणजे, राज ठाकरे येणार असल्याने विद्यार्थ्यांसह, त्यांच्या पालकांची प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी पाहूनच राज यांनी राजकीय विधानाला बाजुला सारत, विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून त्यांना प्रोत्साहन दिले.

राज म्हणाले, "" चित्रकेलासारखा विषय सरकार "ऑप्शनल'ला ठेवतो, तेव्हा संस्थांनी पुढाकार घेऊन या विषयाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कला अंगीकरणे, ती जोपासणे आणि वाढविण्यासाठी शैक्षणिक "डिग्री'ची आवश्‍यकता नाही. या क्षेत्रात येण्यासाठीच मी जे.जे. आर्ट ऑफ स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर माझ्याकडे कोणतीही डिग्री' आहे ? हे फार महत्त्वाचे ठरले नाही.'' 

दरम्यान, राज यांच्या उपस्थितीत व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांनी आपले मनोगत मांडताना, कलेचे महत्त्व पटवून दिले, त्यांचे भाषण ऐकून राज यांनी मिस्त्री यांना "मनसे'त प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com