raj thackray rahul gandhi | Sarkarnama

125 कोटींच्या देशात नरेंद्र मोदींना पर्याय सापडत नाही काय ? राज ठाकरेंचा सवाल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पुणे : पाचही राज्यातील जनतेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले त्याबद्दल मी तेथील मतदारांचे आभार मानतो असे प्रारंभीच स्पष्ट करताना 125 कोटीच्या भारतासारख्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय सापडत नाही काय ? असा संतप्त सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. 

राजस्थान, मध्यप्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकीचे निकालाच भाजपला जोरदार तडाखा बसला. या पार्श्‍वभूमी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. 

ते म्हणाले, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदींची गेल्या साडेचार वर्षांची कामगिरी जनतेने पाहिली. भाजपवर ही वेळ येणार होती. 2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला 165 मिळणे अपेक्षित होते. मात्र, 99 जागा मिळाल्या. कर्नाटकात जी परिस्थिती दिसली आता या राज्यांत दिसत आहे. 

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून हिणवले जात होते. मात्र, पप्पूचा आता परमपूज्य झाला आहे असे सांगून ठाकरे म्हणाले, की सध्याची परिस्थिती आणि वस्तुस्थिती देशाला माहीत आहे. मोठ्या धोक्‍याच्या अगोदर ऊर्जित पटेलांना राजीनामा दिला असावा. आगामी लोकसभेतील निकाल यातून दाखवले आहे. देशभरातील भाजपविरोधातील नाराजी यातून दिसत आहे. देशाला राम मंदिराची नाहीतर राम राज्याची गरज आहे. आता जनता भाजपला मतदान करेल असे वाटत नाही. 

देशात मोदींना राहुल गांधीच्या माध्यमातून पर्याय उभा राहिला असल्याचे त्यांनी एकप्रकारे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीवर विचारले असता 'मिलते हे ब्रेक के बाद', असे म्हणत बोलणं टाळले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख