raj thackray | Sarkarnama

मनेसकडून शोरूमची तोडफोड, पाकला विरोध

सुचिता रहाटे : सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मुंबई : मनसेने पाकिस्तान विरोधात आक्रमक पवित्रा कायम ठेवला असून, लोअर परळच्या फिनिक्‍स मॉलमधील "झारा" शोरूममध्ये तोडफोड केली.नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. 

मुंबई : मनसेने पाकिस्तान विरोधात आक्रमक पवित्रा कायम ठेवला असून, लोअर परळच्या फिनिक्‍स मॉलमधील "झारा" शोरूममध्ये तोडफोड केली.नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे असो वा मनसेचे कार्यकर्ते नेहमीच पाकिस्तान विरोधी भूमिका कठोर भूमिकेत असतात. मध्यंतरी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतावर केलेल्या हत्येच्या निषेधार्थ पाकिस्तानी कलाकारांवर भारतात काम करण्यास बंदी घालण्यात यावी ,यावर मनसेने आक्रमक पवित्रा घेत पाक कलाकारांना भारतात राहण्यास व काम करण्यास विरोध केला होता. पाकिस्तानात बनविण्यात येणारे कपडेही भारतात विकू देणार नाही, या पार्श्वभूमीवर आज मनसेने " झारा" शोरूममध्ये तोडफोड केली. याप्रकरणी नगरसेवक नरवणकर व मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. 
आम्हाला झारा शोरूममध्ये पाकिस्तानमध्ये तयार केलेले कपडे विकत ठेवले असल्याची माहिती मिळाली त्यावरून आम्ही त्यांना रीतसर निवेदन दिले की, हे कपडे विकायला ठेवू नका तरीही त्यांनी आमचं निवेदन मान्य न करता ते पाकिस्तानी कपडे विकत होते, असे दत्ता नरवणकर यांनी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख