राज ठाकरेंच्या शॅडो कॅबिनेटमध्ये औरंगाबादच्या दोघांचा समावेश

राज ठाकरेंच्या शॅडो कॅबिनेटमध्ये औरंगाबादच्या दोघांचा समावेश

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर अंकुश ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट म्हणजे पर्यायी मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे. राज्यभरात चर्चा असलेल्या या शॅडो कॅबिनेटमध्ये काम करण्याची संधी औरंगाबादेतील दोन मनसैनिकांना देण्यात आली आहे. मनसेचे जिल्हा संघटक बिपीन नाईक व माजी संघटक संदीप कुलकर्णी या दोघांचा शॅडो कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

नवी मुंबईत मनसेच्या चौदाव्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा करतांनाच ज्यांना कुणाला काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे जाहीर आवाहन केले होते. शॅडो कॅबिनेटमधील सहकाऱ्यांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर राज ठाकरे यांना आपल्या भाषणात ही सगळी मंडळी माझ्या विश्वासातील असल्याचेही आवर्जून सांगितले. 

राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केल्यानंतर राज्यभरात या नव्या प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे. कुणालाही मुद्दाम त्रास द्यायचा नाही, महिती अधिकारात अर्ज टाकून ब्लॅकमेल करायचे नाही, चांगल्या कामाचे कौतुक करायचे आणि चुकले तर वाभाडे काढायचे अशा स्पष्ट सूचना देत राज ठाकरे यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली. 

विशेष म्हणजे या शॅडो कॅबिनेटमध्ये औरंगाबादेतील दोघांचा देखील समावेश करण्यात आला आहे. मनसेचे जिल्हा संघटक बिपीन नाईक यांची अभिजीत पानसे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभागात तर माजी जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांची नगरविकास खात्याची जबाबादारी असलेले संदीप देशपांडे यांचे सहकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शॅडो कॅबिनेट हा राज ठाकरे यांचा एक महत्वाचा प्रयोग असून यामध्ये औरंगाबादला देखील प्रतिनिधित्व मिळाल्याबद्दल मनसेकडून आनंद व्यक्त केला जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com