मनसेचे मिशन महापालिका; राज ठाकरे तीन दिवस औरंगाबादेत

पक्षाचा झेंडा आणि धोरण बदलल्यानंतर मुंबईत पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात महामोर्चा काढत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर आता राज ठाकरे यांनी औरंगाबाद महापालिका निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्यापासून तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर ते येत आहेत.
raj thackeray will be on aurangabad tour from tomorrow
raj thackeray will be on aurangabad tour from tomorrow

औरंगाबादः पक्षाचा झेंडा आणि धोरण बदलल्यानंतर मुंबईत पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात महामोर्चा काढत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर आता राज ठाकरे यांनी औरंगाबाद महापालिका निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्यापासून तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर ते येत आहेत.

शिवसेनेच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल सुरू केली होती. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकनंतर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रमाणे मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादवर लक्ष केंद्रीत केले, तसेच राज ठाकरे यांनी देखील केले. मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांना जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत मर्यादित यश मिळाले होते. परंतु 2015 च्या निवडणुकीत मनसेच्या एकमेव नगरसेवकाने पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आणि महापालिकेत या पक्षाची पाटी कोरी झाली.

विधानसभा, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका नेहमीच संभ्रमात टाकणारी राहीली होती. औरंगाबाद व्हिजनच्या निमित्ताने राज ठाकरे वर्षभरापुर्वी औरंगाबादकरांना पुन्हा एकदा सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित शहराचे स्वप्न दाखवले, पण त्यावर पुढे काहीच काम झाले नाही. पक्षांतर्गत कुरबुरी, पदाधिकाऱ्यांचे हेवेदावे यामुळे पक्षाकडे तरुणांची मोठी शक्ती असून देखील मनसेला आपला प्रभाव पाडता आला नाही.

मनसेने कात टाकली...
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात मैदानात उतरलेले राज ठाकरे आता शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन करत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्ता हस्तगत केल्यानंतर पुन्हा आपल्या भूमिकेत बदल केला आहे. प्रखर हिंदुत्वाची भूमिका शिवसेनेला अडचणीची ठरत असतानाच मनसेने ही जागा भरून काढण्याची रणनिती आखली.

पाच रंगांचा मनसेचा झेंडा आता भगवा झाला, त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा देखील आली. या नव्या भूमिकेमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये तर चैतन्य निर्माण झालेच, पण महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे दुखावले गेलेले अनेक शिवसेना, कॉंग्रेस व इतर हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते मनसेकडे आर्कषित झाले आहेत. या जोरावरच मनसे औरंगाबाद महापालिकेत मुंसडी मारण्याच्या तयारीत आहे.

`संभाजीनगर'चा मुद्दा पळवला..
महापालिका निवडणुकीच्या पुर्वतयारी आणि चाचपणीच्या दृष्टीने राज ठाकरे यांचा उद्यापासून (ता.13) सुरू होणारा तीन दिवसीय औरंगाबाद दौरा महत्वाचा समजला जातोय. या दौऱ्यांच्या नियोजनासाठी शहरात दाखल झालेले मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या निवडणुकीत आपल्या पक्षाची दिशा काय असेल याची एक झलक दाखवून दिली.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत औरंगाबाद शहराच्या `संभाजीनगर' नामकरणाचा मुद्दा नेहमी उपस्थित केला जातो. शिवसेना-भाजप युतीच्या पंचवीस वर्षांच्या महापालिकेवरील सत्तेत या नामकरणाने महत्वाची भूमिका बजावली आहे. परंतु महाविकास आघाडीत सहभागी झाल्यामुळे शिवसेनेला हा हुकमी पत्ता यावेळी प्रचारात वापरता येणार नाही असे दिसते. नेमका याचाच फायदा उठवण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करा अशी मागणी राजू पाटील यांनी मनसेच्या वतीने केली आहे.

शिवसेनेकडून याबाबत अद्याप कुठल्याही प्रतिक्रिया उमटलेल्या नाहीत, मात्र महापालिका निवडणूक प्रचारात या विषयावरून मनसे विरुध्द शिवसेना असा संघर्ष भडकण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com