राज ठाकरे म्हणाले `ही तर राज्यातील मतदारांशी प्रतारणा' 

गेल्या दीड महिन्यात महाराष्ट्रात सत्तेसाठी जे काही घडले ती राज्यातील मतदारांशी प्रतारणा होती, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे म्हणाले `ही तर राज्यातील मतदारांशी प्रतारणा' 

पुणे : गेल्या दीड महिन्यात महाराष्ट्रात सत्तेसाठी जे काही घडले ती राज्यातील मतदारांशी प्रतारणा होती, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. 

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी भाजपा-शिवसेनेसह कॉंग्रेस राष्ट्रवादीवरही टीका केली. 
या साऱ्या प्रकारावर महाराष्ट्रातील जनता नाराज असून पुढच्या निवडणुकीच्या मतदानावर याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

राज्यातील जनता जागरूक आहे. निवडणुकांआधी ज्यांनी पक्षांतरे केली. त्यातील बहुतांश लोकांना त्यांनी जागा दाखवून दिली ही समाधानाची बाब असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर राजकीय पक्ष व नेत्यांचे मूल्यामापन करताना माध्यमानी नेत्यांना विविध प्रकारच्या उपाध्या दिल्या. मात्र, यशाला बाप आणि पराभवाला सल्लागार खूप असतात, असे त्यांनी सांगितले. 

निकालानंतर शरद पवार यांच्याबद्दल जे सकारात्मक बोलले गेले ते 24 ऑक्‍टोबरच्या आधी बोलले जात नव्हते. त्याचप्रमाणे निकालाआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जे सकारात्मक बोलले जात होते ते निकालानंतर बोलले गेले नाही. 

अजित पवार यांना बरोबर घेऊन भाजपाने सत्तेवर येण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्नदेखील चुकीचा होता. मतदाराच्या मनात याचाही राग आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. 

महाराष्ट्र विकास आघाडीच्या राज्यातील आगामी आघाडीबद्दल विचारले असता, आधी यांचे अधिवेशन तर संपू द्या, असे म्हणत यावर बोलण्याचे ठाकरे यांनी यांनी टाळले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com