मोदींच्या भाषणात लोकांना आशेचा किरण दिसायला हवा होता - राज ठाकरे

पंतप्रधान मोदी यांच्या कालच्या भाषणात लोकांना आशेचा किरण दिसायला हवा होता, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
Raj thackeray criticises pm modi speech
Raj thackeray criticises pm modi speech

पुणे - पंतप्रधान मोदी यांच्या कालच्या भाषणात लोकांना आशेचा किरण दिसायला हवा होता, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. 

पंतप्रधान मोदी यांनी पाच एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील दिवे बंद करून मेणबत्ती लावा. टॉर्च लावा किंवा मोबाईल फ्लॅश दाखवण्याचे आवाहन केले आहे. त्याबाबत राज ठाकरे म्हणाले, की लोक 9 मिनिटे मेणबत्त्या लावतीलही. पंरतु, मोदींच्या भाषणात लोकांना आशेचा किरण दिसायला हवा होता. तर लोकांना समाधान वाटले असते. देश म्हणून कुठे चाललो आहोत, हे त्यातून कळायला हवे होते. 

सध्या लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, की लोकांच्या मनातील ही संभ्रमावस्था मोदींना संपवायला हवी होती. वैद्यकीय यंत्रणा कशी राबतेय, हे सांगायला हवे होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com