raj thackeray on ayodya verdict | Sarkarnama

अयोध्य निकाल : हा निर्णय एेकायला आज बाळासाहेब असायला हवे होते - राज ठाकरे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. अयोध्येतील आपल्या राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान केलं, त्याचं आज सार्थक झाले, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

पुणे - आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. अयोध्येतील आपल्या राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान केलं, त्याचं आज सार्थक झाले, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

अयोध्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ठाकरे यांनी ट्विट करीत म्हटले आहे, की देशातील बहुसंख्य जनतेच्या मनातील भावना आणि वास्तव लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जो आज निर्णय दिलाय त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. 

``आता लवकरात लवकर राममंदिराची उभारणी व्हायला हवी आणि रामराज्य देखील यायला हवे. हा निर्णय एेकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता,'' असेही त्यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख