राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी; सहगल यांना विरोध नसल्याचे केले स्पष्ट

ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनाविरोध नसल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे.
राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी; सहगल यांना विरोध नसल्याचे केले स्पष्ट

पुणे : ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना विरोध नसल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे.

मराठी साहित्य संमेलनाला येण्यास सहगल यांना विरोध नसल्याची भूमिका मांडताना ठाकरे यांनी म्हटले आहे, की ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही. यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सहगल यांनी जरुर यावं. आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो. 

सहगल यांच्या स्वागताची भूमिका मांडतानाच, ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनाही फटकारले आहे. `संवेदनशील विषयांवर भूमिका व्यक्त करताना माझ्याशी चर्चा केल्याशिवाय भूमिका मांडू नये,' अशी तंबीच ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.

सहगल यांच्या संमेलनाला येण्याविषयी ठाकरे यांनी म्हटले आहे, की सहगल यांच्यासमोर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल आणि ही परंपरा त्या जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेतील एक वाहक होणार असतील, तर त्यांच्याविषयी आम्हाला आक्षेप असण्याचं कारणच नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com