भगवा झेंडा माझ्या मनातच होता, तोच आमचा " डिएनए ' आहे - राज ठाकरे

मी जो हिंदुत्वाचा पुरस्कार करतोय ते काही आज करत नाहीए त्याच्याब्दद्‌ल जे लोक काही मत व्यक्त करत आहेत तो योगायोग आहे मी आधीपासून हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही आणि कधी सोडणारही नाही. माजी राष्ट्रपती ए. पी जे अब्दुल कलाम हे आम्हाला नेहमीच आदरणीय आहेत. राष्टवादी मुस्लिम आमचेच आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.
भगवा झेंडा माझ्या मनातच होता, तोच आमचा " डिएनए ' आहे - राज ठाकरे

मुंबई : मनसेची जेव्हा स्थापना केली तेव्हाही माझ्या मनात भगवा झेंडाच होता, मात्र त्यावेळी अनेकांनी सोशल इंजिनीयरिंगचा सल्ला दिल्याने तेव्हा हा झेंडा आणला नाही मात्र गेल्या दोन वर्षांपासून हाच झेंडा माझ्या मनात होता मी आज हा झेंडा आणला आहे आणि हिंदुत्व हाच माझा "डिएनए' आहे, मी मराठी आहे आणि हिंदूही आहे असा दणदणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. 

मनसेच्या अधिवेशनाच्या समारोपाला राज ठाकरे यांचे भाषण झाले, त्यांनी अनेक मुद्याचा परामर्ष घेतला. आपल्या संघटनेचा झेंडा का बदलला याचे त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले तसेच मनसे मराठीच्या मुद्यावर ठाम असेल आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरही आक्रमक असेल अशे त्यांनी स्पष्ट केले. 

मी जो हिंदुत्वाचा पुरस्कार करतोय ते काही आज करत नाहीए त्याच्याब्दद्‌ल जे लोक काही मत व्यक्त करत आहेत तो योगायोग आहे मी आधीपासून हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही आणि कधी सोडणारही नाही. माजी राष्ट्रपती ए. पी जे अब्दुल कलाम हे आम्हाला नेहमीच आदरणीय आहेत. राष्टवादी मुस्लिम आमचेच आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com