raj tacray james dog | Sarkarnama

राज ठाकरे जेव्हा लाडक्‍या जेम्स आणि रेम्बोची भेट घेतात...! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मुंबई : राज ठाकरे यांनी आपल्या लाडक्‍या जेम्स आणि बॉंडचा मुलगा रेम्बोची अनेक महिन्यांनी भेट घेतली. या भेटीने जेम्स-रेम्बो आज खूश होते. 

राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला यांच्यावर जेम्सने हल्ला केला होता. त्यानंतर त्यांची रवानगी फार्म हाऊसवर करण्यात आली होती. 

राज ठाकरे आज डोंबिवलीतील मनसे नेते राजू पाटील यांच्या कार्यालयात आले होते. यावेळी राज यांनी पाटील यांना दिलेल्या आपल्या लाडक्‍या श्‍वानासोबत थोडा वेळ व्यथित केला. त्यानंतर ते सुनील नगर येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाचे उद्‌घाटन केले. या वेळी विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांच्या राजाजी पथ येथील जनसंपर्क कार्यलयाचे उद्‌घाटन आणि मंदार हळबे यांच्या प्रभागात बगीचाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर राज मुंबईच्या दिशेने रवाना झाले.. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

संबंधित लेख