raj purohit | Sarkarnama

मुंबईत 14 हजारांपेक्षा जास्त इमारती धोकादायक - पुरोहित

ब्रह्मदेव चट्टे
शनिवार, 22 एप्रिल 2017

मुंबई : मुंबई शहरातील धोकादायक इमारती व चाळींची संख्या तब्बल 14 हजार 600 एवढी आहे. अशा इमारतींत राहणारे भाडेकरू कित्येक वर्षे, पिढ्यानपिढ्या धोकादायक परिस्थितीत जगात आहेत. मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मुंबईतील जुन्या व धोकादायक इमारती तसेच चाळींचा पुनर्विकास करण्यात यावा व तेथील भाडेकरूंना 500 चौरस फुटांचे स्वतंत्र घर देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कुलाब्याचे आमदार राज पुरोहित यांनी केली आहे. 

महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबईतील गिरणी कामगारांसाठी मिलच्या जागेवरील पुनर्विकास योजनेत 405 चौ. फुटांचे घर देण्याचा, मेट्रो रेल्वे प्रकल्पबाधितांना कमीतकमी 405 चौ. फुटांचे घर देण्याचं निर्णय घेतला. तसेच मुंबईतील बऱ्याच जुन्या व प्रसिद्ध बीडीडी चाळींचाही पुनर्विकास करण्याचा निर्णय घेत सामान्य नागरिकांना हक्काचे व मोठे घर देण्याचं निर्णय सरकारने घेतला. या निर्णयानुसारच मुंबईतील जुन्या चाळी तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. अशा इमारतींत राहणारे भाडेकरू कित्येक वर्षे, पिढ्यानपिढ्या धोकादायक परिस्थितीत जगत असल्याचे राज पुरोहित यांनी सांगितले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख