Raincoats to Warkaris by CM Devendra Phadanavis | Sarkarnama

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वारकऱ्यांना ५ लाख रेनकोट

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 19 जून 2019

नाशिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन ीगतवर्षी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात आपला खारीचा वाटा असावा अशी भूमिका मांडली होती. त्यानुसार यंदाच्या निवृत्तीनाथ पालखीतील वारकऱ्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठविलेल्या रेनकोटचे वाटप करण्यात येत आहे. राज्यभर पाच लाख रेनकोट वाटप करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. 

त्र्यंबकेश्‍वर येथून मंगळवारी निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल सातपूर येथे मुक्कामी होती. आज तिचे नाशिक शहरात आगमण झाले. तीचे पारंपारीक पध्दतीने उत्साहात स्वागताची परंपरा आहे. महापालिकेच्या खर्चातून होणारे हे स्वागत गतवर्षी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नाकारले होते. त्यानंतर स्वयंसेवी संस्थांतर्फे हे स्वागत करण्यात आले होते. यंदा मात्र स्वागताला महापौर रंजना भानसी व महापालिकेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 

मंगळवारी भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक शशिकांत जाधव, भाजपचे प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी यांसह विविध पदाधिकारी होते. त्यांच्या हस्ते या वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप केले. मुख्यमंत्र्यांच्या नियोजनाअंतर्गत, नाशिक, त्रंबकेश्वर मध्ये रेनकोट वाटप करण्याची जवाबदारी नाशिक निर्मलवारी ह्या स्वयंसेवी संस्थेस दिली होती. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय, सुरेश बाबा पाटील, आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. 

यावेळी संस्थेतर्फे श्रीपाद दाभक, डॉ. भरत केळकर, सुनील सावंत, नगरसेवक शशिकांत जाधव, मीनल भोसले, सुनील लोहगावकर, सुनील जाजू, सुनीता धोंडगे, वैभव गुंजाळ, सुनील सुपेकर, डी एम कुलकर्णी, कुमुदिनी कुलकर्णी, मोजाड ताई, राजेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. आषाढी वारी पावसाळ्यात असल्याने वारीच्या मार्गात अनेक ठिकाणी वारकऱ्यांना पावसातच मार्गक्रमण करावे लागते. त्याने मोठी गैरसोय होती. त्यादृष्टीने रेनकोटचे वाटप करण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख