Railway To Take Action On Taxi Driver Who Troubled MP Supriya Sule | Sarkarnama

सुप्रिया सुळे यांना त्रास देणाऱ्या टॅक्सी दलाला विरुद्ध रेल्वे मंत्रालय करणार कारवाई

मिलिंद संगई
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी दादर रेल्वेस्थानकावर गैरवर्तन करणाऱ्या कुलजीत सिंह मल्होत्रा या दलाला विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे मंत्र्याने मंत्रालयाने दिले असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

बारामती शहर  : खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी दादर रेल्वेस्थानकावर गैरवर्तन करणाऱ्या कुलजीत सिंह मल्होत्रा या दलाला विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे मंत्र्याने मंत्रालयाने दिले असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

आज सकाळी दादर रेल्वे स्थानकावर सुप्रिया सुळे बोगीतून उतरत असताना टॅक्सी हवी आहे का , असे म्हणत सुप्रिया सुळे यांच्या जवळ जात त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न कुलदीप सिंह मल्होत्रा या दलालाने केला. रेल्वे बोगी तून खाली उतरत असताना , बॅगा खाली घेत असताना आणि पुन्हा प्लॅटफॉर्मवरून निघाले असताना असे चार वेळा अतिशय जवळ येऊन मल्होत्रा याने टॅक्सी हवी आहे का, असे विचारत सुप्रिया सुळे यांच्याशी गैरवर्तन केले.

यानंतर सुप्रिया सुळे यांनी संबंधित दलालाचा मोबाईल मध्ये फोटो काढताना त्याने फोटो काढण्यास विरोध न करता उलट फोटोसाठी पोज दिली, यावरून त्यांची मुजोरी समोर आली असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्यानंतर सुळे यांनी रेल्वेस्थानकावर जाऊन संबंधित मनोत्रा या दलाला विरुद्ध रितसर लेखी तक्रार नोंदविली. याबाबतचे ट्विट केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने ही तातडीने याची दखल घेतली व संबंधित दलाला विरुद्ध तातडीने कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही सुप्रिया सुळे यांना दिली असल्याची माहिती खुद्द सुप्रिया सुळे यांनीच  दिली. 

हा प्रकार अत्यंत गंभीर असून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील धोकादायक आहे असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. ज्या महिला एकट्याने प्रवास करतात त्यांनी अशा अनोळखी टॅक्सी चालकांना टॅक्सीमध्ये बसू नये, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख