कोरोना व्हायरसमुळे रेल्वे मंत्रालय अॅलर्ट; स्थानिक भाषेत माहिती फलक लावणार

Railway Minstry Sounded Alert in the Wake of CORONA Outbreak
Railway Minstry Sounded Alert in the Wake of CORONA Outbreak

मुंबई : चीन मधील कोरोना व्हायरसमूळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. भारतातमध्येही काही संशयीत रुग्ण आढळले आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी केली जात असतांना, रेल्वे मंत्रालयाने सुद्धा सर्व रेल्वे विभागांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वे स्थानकांवर स्थानिक भाषेत माहिती फलक लावून, संशयीत रुग्णांसाठी विशेष वार्ड तयार करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील मध्य आणि पश्‍चिम रेल्वे प्रशासनाला दिले आहे.

उत्तर प्रदेश, राज्यस्थान, दिल्ली या राज्यांमध्ये काही संशयास्पद कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने, रेल्वे मंत्रालयाने कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सर्व रेल्वे विभागांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रेल्वे प्रवासादरम्यान ताप आलेला संशयीत रुग्ण आढळल्यास त्याला इतर रुग्णांपासून दुर ठेवावे, त्यासाठी रेल्वे रुग्णालयामध्ये विशेष वार्ड तयार करून उपचार करावा, वार्डमध्ये व्हायरसपासून वाचण्यासाठी डॉक्‍टरांना संरक्षणाचे पोषाख उपलब्ध करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे आदेश आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना व्हायरस संदर्भातील उपचारासाठी प्रशिक्षण सुरू केले आहे. यामध्ये रेल्वे डॉक्‍टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे आदेशही रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. दरम्यान रेल्वेच्या रुग्णालयात संशयीत किंवा कोरोना व्हायरस झालेला रुग्ण आढळल्यास ताबडतोप रेल्वे विभागाचे रुग्णालय आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला संपर्क करण्याचे आवाहन रेल्वे मंत्रालयाने केले आहे.

मुंबईतील रेल्वे स्थानकावर तपासणी यंत्रणाच नाही

दिल्ली, राज्यस्थान, तेलंगणा, उत्तरप्रदेश या राज्यातून दरदिवशी शेकडो प्रवाशी रेल्वे मार्गांने मुंबईत दाखल होत असतात. मात्र, हे प्रवासी स्टेशनवर उतरल्यानंतर त्यांना तपासण्यासाठी रेल्वेने कोणतीही सुविधा कार्यान्वित केली नाही. त्यामुळे मुंबईतील पश्‍चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल, तर मध्य रेल्वे मार्गांवरील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे स्थानक प्रवाशांसाठी असुरक्षीत असल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com