raigad and sindhudurg sp give kit to police | Sarkarnama

रायगड व सिंधुदर्ग पोलिसांच्या हाती एक `पाकिट!` ज्याने त्यांना बरे वाटले..!!

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 एप्रिल 2019

पुणे : वरिष्ठांचे आदेश पाळायचे आणि ड्युटीवर हजर व्हायचे, असा खाक्या पोलिस खात्यात असतो. या शिस्तीच्या खात्यात वरिष्ठ जर संवेदनशीलतेने विचार करणार असतील तर पोलिसांचाही ऊऱ भरून येतो. रायगडमध्ये काल असेच घडले.

पुणे : वरिष्ठांचे आदेश पाळायचे आणि ड्युटीवर हजर व्हायचे, असा खाक्या पोलिस खात्यात असतो. या शिस्तीच्या खात्यात वरिष्ठ जर संवेदनशीलतेने विचार करणार असतील तर पोलिसांचाही ऊऱ भरून येतो. रायगडमध्ये काल असेच घडले.

मतदान केंद्रावरील ड्युटीसाठी आदल्या दिवशीच पोलिसांना हजर व्हावे लागते. झोपेपासून ते नैमित्तिक कामे करणेही अवघड होऊन बसते. रायगड जिल्ह्यातील पोलिस नेहमीप्रमाणे असे मतदान केंद्रांच्या ड्युटीवर हजर होण्याच्या तयारीत असताना त्यांच्या हातात एक पाकिट पडले. त्यात एक टूथ ब्रश, पेस्ट, साबण, शेव्हिंग किट, बिस्किट, चाॅकलेट, हेअर आॅइल, बिस्किट पुडे, उन्हाळ्यात खबरदारी घेण्यासाठी ओआरएस पावडरच्या पुड्या या साऱ्यांचा समावेश असलेले किट अलिबागमध्ये अडीच हजार पोलिसांच्या हाती देण्यात आले.

इलेक्शन ड्युटीसाठी तेलंगणा पोलिस कर्मचारी, केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दल यांच्या तुकड्या अलिबागमध्ये दाखल झाल्या. त्यांना मतदान केंद्रांचे वाटप होत असतानाच रायगडचे पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या पुढाकाराने प्रत्येक पोलिसाला हे किट देण्यात आले. वरिष्ठांनी आपल्या बारीक-सारीक गोष्टींचा विचार करून हे किट तयार केल्याचे पोलिसांनाही आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला.

अशा प्रकारे किट द्यावेत, ही मूळची कल्पना सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची. पारस्कर व गेडाम या दोघांनी मिळून ती राबविली. रत्नागिरी आणि रायगड या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील एकूण चार हजार कर्मचाऱ्यांना हे किट देण्यात आले. दुर्गम भागात नेमणूक झाली असेल तर खिशात पैसे असूनही या गरजेच्या वस्तू मिळत नाहीत. त्याचा विचार करून हे किट तयार करण्यात आले.

पोलिसांच्या मुक्कामाची सोय योग्य ठिकाणी व्हावी यासाठी पारस्कर यांनी महिनाभरापासून आधीच नियोजन केले. तसेच किटचीही तयारी सुरू केली होती. रत्नागिरी आणि रायगडमध्ये उद्या (ता. 23) मतदान होणार आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख