राहुरी विद्यापीठाचे कुलगुरुही विलगीकरण कक्षात

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा आणि अधिष्ठाता डॉ. ए. एल फरांदे यांना आज आयसोलेशन वार्डमध्ये ठेवावे लागले.
Rahuri Agri University Vice Chancellor Forefully Qurantined
Rahuri Agri University Vice Chancellor Forefully Qurantined

नाशिक :  महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा आणि अधिष्ठाता डॉ. ए. एल फरांदे यांना आज 'डिटेंड' करून आयसोलेशन वाॅर्डमध्ये ठेवावे लागले. विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. ए. एल. फरांदे हे पण आता विलगीकरण कक्षात आहेत.

हे दोघे अमेरिकेतून एका परिषदेला उपस्थित राहून मंगळवारी परतले होते. कॉन्फरन्स अटेंड करून परवा भारतात परतल्यावर त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले होते.

हे दोघेजण ज्या विमानाने दिल्लीपर्यंत आले त्या विमानांमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे, त्यामुळे काळजी वाढली आहे. त्यावर योग्य ती खबरदारी घेत असल्याचे कुलगुरूंनी सांगितले आहे.

दरम्यान यासंदर्भात कुलगुरु विश्‍वनाथा यांच्याशी संपर्क केला असता, ''आम्ही अमेरिकेत आठ दिवस होतो. भारतात परतल्यावर कोरोना संदर्भात सर्व निकश व चाचण्या पूर्ण केल्या आहेत. आम्हाला क्वारंटाईन केले होते. मात्र तिथेही सर्व चाचण्या निगेटिव्ह आहेत. त्यामुळे आम्हाला सोडण्यात आले आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com