मोदींसारखी भाषणबाजी जमत नाही, पण लोकांचे ऐकायला आवडते : राहुल गांधी  - rahul rally gujarat | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींसारखी भाषणबाजी जमत नाही, पण लोकांचे ऐकायला आवडते : राहुल गांधी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

सुरत : "" मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे भाषणबाजी करायला जमत नाही. मात्र, लोक आपणासमोर समस्याचा पाढा वाचतात. या समस्या मी समजून घेतो. लोकांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकतो. त्यांचे प्रश्‍न कसे मार्गी लागतील यासाठी प्रयत्न करतो. मोदींसारखी नुसतं बोलत नाही अशी खोचक टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे केली. 

सुरतमधील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी सुरतच्या दौऱ्यावर आहेत. गुजरातमधील उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधीसमोर बोलताना त्यांनी मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, "" कॉंग्रेस आणि भाजपमध्ये साधारणपणे हाच फरत आहे. पंतप्रधान मोदींसह भाजपची मंडळी खूप बोलतात. मात्र प्रश्‍न समजून घेत नाही. लोकांचे म्हणणे काय आहे याचा विचार करीत नाही. त्यामुळे लोकांचे प्रश्‍न सुटत नाही. ही मंडळी बोलघेवडी आहेत त्यांचा उपयोग नाही असे लोकांना आता वाटू लागले आहे. कॉंग्रेस आणि विशेषत: माझ्या विषयी म्हणाल तर लोकांचे म्हणणे मी ऐकून घेत असतो. त्यांचे प्रश्‍न कसे मार्गी लागतील यासाठी माझा प्रयत्न असतो. मोदींसारखी भाषणबाजी मी कधीच करीत नाही. 

आणि माझ्या पक्षातील सर्व नेत्यांना उद्योग क्षेत्रात जे काही सुरू आहे. त्यांच्या प्रश्‍नाची आम्हाला जाणीव आहे. ते मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. त्यातून मार्ग कसा काढता येईल. प्रश्‍न कसा सुटेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जर राज्यात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर उद्योगक्षेत्रासाठी आपले सरकार भरीव काम करेल असा विश्वासही राहुल गांधी यांनी शेवटी व्यक्त केला. 

दरम्यान, राहुल गांधीच्या दौरा सुरू असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख