rahul patil and shivsena | Sarkarnama

मतदार संघाच्या विकासाचे माझे नियोजन तयार : डॉ. राहुल पाटील

गणेश पांडे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

परभणी : मतदार संघाचा विकास हाच माझा ध्यास आहे. गेल्या पाच वर्षात मतदार संघातील पाणी प्रश्न, रस्ते व इतर महत्वपूर्ण विषयाची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आता आगामी पाच वर्षाच्या काळाचे नियोजन आपल्याकडे तयार आहे. महिला, युवकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या सक्षमीकरणासाठीची पाऊले उचलले जाणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली. 

परभणी : मतदार संघाचा विकास हाच माझा ध्यास आहे. गेल्या पाच वर्षात मतदार संघातील पाणी प्रश्न, रस्ते व इतर महत्वपूर्ण विषयाची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आता आगामी पाच वर्षाच्या काळाचे नियोजन आपल्याकडे तयार आहे. महिला, युवकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या सक्षमीकरणासाठीची पाऊले उचलले जाणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली. 

परभणी विधानसभा मतदार संघातून शिवसेना - भाजप रासप- रिपाई, शिवसंग्राम, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मतदार संघातील विकास कामाचा लेखा जोखा मांडला. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात आपण मतदार संघ पाणीदार करण्यासाठी प्रयत्न केले. शहरातील पिंगळगढ नाल्याच्या खोलीकरण व सरळीकरणाचे काम हाती घेवून ते पाणी याच मतदार संघातील शेतासाठी थांबविण्याचे काम केले. हा नाला कृषी विद्यापीठातून वाहत होता. नाला पूर्णपणे भरल्यानंतर विद्यापीठातील संशोधीत वाणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते होते. तसेच पावसाचे पाणी नाल्यावाटे पुढे वाहून जात होते. परंतू खोलीकरणाच्या कामामुळे हे पाणी नाल्यातच साचून राहत आहे. परिणामी या भागातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मतदार संघातील गावे हे जिल्ह्याच्या ठिकाणाला जोडली जावीत हे आपले स्वप्न होते 

ग्रामीण भागातील लोकांना कधी - कोणत्यावेळी जरी परभणी शहरात यायचे असेल तर रस्ता आवश्‍यक आहे हे मी जाणून होतो. गावात येण्या जाण्यासाठी वाहने असतात. परंतू खराब रस्त्यामुळे वाहने वेळेत परभणीत पोहच नव्हती. त्यामुळे गाव तेथे पक्का रस्ता हा मी संकल्प पूर्ण केला आहे असे डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले. मतदार संघातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण वंदनीय बाळासाहेब ठाकरे महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून हजारो लोकांची मोफत आरोग्य तपासणी व त्यांना मोफत उपचार दिले. अनेक रुग्णांच्या अवघड व खर्चीक शस्त्रक्रिया मोफत केल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य मला समाधान देऊन गेले. 

महिला बचत गटासाठी स्वतंत्र पतसंस्था काढून त्या बचत गटांना बळकटी देण्याचे काम करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणासाठी माझ्या मतदार संघातील हे महत्वपूर्ण पाऊल आहे असे मी समजतो असे डॉ. पाटील यांनी सांगितले. शहरातील वाचकांसाठी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांसाठी सुसज्य ग्रंथालयाची निर्मीती हे देखील आपल्या कार्यकाळातील महत्वाचे पाऊल आहे. अद्यायावत बसपोर्टची निर्मीती लवकर होईल. आता आगामी पाच वर्षातील विकासाचे नियोजन आपण केले आहे. आगामी पाच वर्षात मतदार संघातील सर्वसामान्य नागरिक महिला, युवक- युवती यांचा विकास हे काम प्राधान्याने केले जाणार आहे असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख