rahul kul should stop dreaming in day : | Sarkarnama

`राहुल कुल यांनी दिवसा स्वप्ने बघू नयेत`

मिलिंद संगई
गुरुवार, 16 मे 2019

बारामती शहर : बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयाचे राहुल कुल दिवसा स्वप्न पाहत आहेत, येत्या 23 तारखेला या राज्यालाच नव्हे तर देशालाही बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार नेमके कोणाच्या मागे आहेत याची प्रचिती येईल, अशा शब्दात बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी कुल यांच्यावर टीका केली आहे.

`बारामतीत राष्ट्रवादीचा अपेक्षाभंग होणार`, असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादीकडूनही तत्परतेने त्याला उत्तर दिले गेले.

होळकर म्हणाले की राहुल कुल यांनाही निकालानंतर समजेल की या मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे आणि कोणाला दिल्लीला पाठवायचे याचे चांगलेच ज्ञान मतदारांना आहे. गेल्या पन्नास वर्षात या मतदारसंघातील मतदारांनी सत्तेचे अनेक चढउतार अनुभवले आहेत, मात्र सर्व लाटांमध्येही शरद पवार यांच्या पाठीशीच मतदार खंबीरपणे उभा राहिला आहे, हा इतिहास आहे. या निवडणूकीतही त्याचे चित्र निकालात स्पष्ट दिसेल, सुप्रिया सुळे केवळ बारामतीच नाही तर सर्वच विधानसभा मतदारसंघात भरघोस मताधिक्याने निवडून येतील, यात शंका नाही.

कुल यांनी राष्ट्रवादीच्या अपेक्षाभंगाचे स्वप्न पाहण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाकडे व्यवस्थित लक्ष द्यावे, असा टोलाही होळकर यांनी लगावला. कोणत्या मतदारसंघात किती मताधिक्य मिळेल याचे आकडे आठवडाभरातच सर्वांच्या समोर येतील, त्या नंतरच आम्ही या बाबत अधिकचे भाष्य करु असेही होळकर म्हणाले. 

बारामतीत लाखाचे मताधिक्य मिळणारच....
पवारांनी बारामतीचा केलेला विकास, सरकारविरोधी तयार झालेले जनमत, राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे, या मुळे बारामतीतच सुप्रिया सुळेंना लाखाच्या वर मताधिक्य निश्चित मिळेल, सुळे या भरघोस मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास संभाजी होळकर यांनी व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख