बारामतीकरांनी वाढले तरच खायचे ही पद्धत बंद : राहुल कुल

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल कुल यांना लक्ष्य केल्यानंतर त्यांनीही आत बारामतीकरांवर हल्लाबोल सुरू केला आहे. बारामतीच्या जोखडातून दौंड तालुका मुक्त केल्याचा दावा कुल करू लागले आहेत.
बारामतीकरांनी वाढले तरच खायचे ही पद्धत बंद : राहुल कुल

केडगाव : दौंड तालुक्याला किती विकास निधी द्यायचा, कोणती कामे करायची, दौंडला कोणते प्रकल्प आणायचे, दौंडला लोकल चालू करायची की नाही, मुळशीचे पाणी आणायचे की नाही, चौफुल्याजवळील नियोजित एमआयडीसी करायची की नाही. याचा निर्णय बारामतीत बसून करायचा की, मंत्रालयात बसून करायचा हे ठरविण्याची ही निवडणूक आहे. तालुका बारामतीच्या हातात द्यायचा की मुख्यमंत्र्याच्या हातात हे जनतेने ठरवावे, असे मत भाजपचे उमेदवार आमदार राहुल कुल यांनी केले व्यक्त केले आहे.

रावणगाव ( ता.दौंड ) येथे कुल यांच्या प्रचारार्थ सभा झाली त्यावेळी कुल बोलत होते. यावेळी नंदू पवार, आनंद थोरात, राजाराम तांबे, महेश भागवत, दादा केसकर, हरीश खोमणे, अनिल सोनवणे, नागसेन धेंडे, शिवाजी काळे, लक्ष्मण रांधवण, संपत आटोळे, अरूण आटोळे, हौशीराम आटोळे, विनोद गाढवे, नीलेश पोमणे आदी उपस्थित होते.

कुल म्हणाले, ``बारामतीकरांनी वाढले तरच दौंडकर खाणार अशी २०१४ पर्यंतची कार्यपद्धती राहिली आहे. २०१४ ला दौंड प्रथमच या जोखडातून मुक्त केले आहे. त्यानंतर मोठा फरक जाणवला. दौंडला स्वतंत्र प्रांत कार्यालय आणले, दौंड जिल्हा न्यायालय आणणार आहोत. वीजेचे विभागीय कार्यालय आणले, क्रीडा संकुलाचे कामी मार्गी लागले आहे. दौंडला नाटयगृह बांधण्यात येणार आहे. चौफुल्याजवळील एमआयडीसीची अधिसूचना निघाली आहे.

लोकलचा प्रश्न व मुळशी पाणी प्रश्न सोडविण्यात मुख्यमंत्री सकारात्मक आहेत.  भविष्यात बारामती कमी करून दौंडचे वैभव वाढविणार आहे, असा दावा त्यांनी केला.

नंदू पवार म्हणाले, निवडणूक विधानसभेची आणि राष्ट्रवादीला मिरची लागली लोकसभेची. कुल यांनी प्रत्येक गाव विकासनिधीतून करोडपती केले. धनगर आरक्षणाचा प्रश्न भाजप सरकारच सोडवू शकते. आरक्षणाचा ९० टक्के प्रश्न सुटला आहे.


शिवाजी काळे म्हणाले, राष्ट्रवादीचे लोक घरात घुसून मारण्याची भाषा बोलतात. मारायचे तर सोडा पण नजरेला नजर देऊन बोलू शकत नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com