राहुल कुल हे 6339 तर; भरणे केवळ 3670 मतांनी आघाडीवर

राहुल कुल हे 6339 तर; भरणे केवळ 3670 मतांनी आघाडीवर

पुणे : दौंड मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजप उमेदवार व विद्यमान आमदार राहुल कुल हे ६३३९ मतांनी आघाडीवर आहेत.

 दौंड मतदारसंघातील ३,०९, १६८ मतदारांपैकी २१२४१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये ११४२२२ पुरूष, ९८१९२ महिला व १ तृतीयपंथीय यांचा समावेश आहे.आज (ता. २४) सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात झाली.

पहिल्या फेरीत राहुल कुल यांनी ४६१०, दुसरी - ७५३१, तिसरी - ७८५२, चौथी - ८१८३ व पाचव्या फेरीअखेर ६३३९ मतांची आघाडी मिळाली. पाचव्या फेरीअखेर भाजप उमेदवार राहुल कुल यांना २९७६५ तर राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांना २३४२६ मते मिळाली होती. १२६ मतदारांनी नोटा चा पर्याय स्वीकारला. मतमोजणीच्या एकूण २२ फेर्या आहेत.

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात  विद्यमान आमदार सुरेश गोरे हे 11 व्या फेरीअखेर तिसर्या क्रमांकावर असून ते पहिल्या क्रमांकांवरील दिलीप मोहिते यांच्यापेक्षा 12779  मतांनी पिछाडीवर आहेत.

इंदापूर विधानसभा मोजलेली मते 69309, दत्तात्रय भरणे 36652, हर्षवर्धन पाटील 31982,                                                                               दत्तात्रय भरणे   आघाडी 3670

वडगाव शेरी (208)- मतमोजणी फेरी -  जगदीश मुळिक (भाजप) - 20738, सुनील टिंगरे ( राष्ट्रवादी ) - 29222 टिंगरे यांना मिळालेले मताधिक्य -8484

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेण्यात आल्यामुळे या मतदारसंघात 9.30 वाजल्यापासून मतमोजणी बंद पडली आहे. सकाळपासून या मतदारसंघात फक्त पहिल्या फेरीची मतमोजणी झाली आहे. 

कोरेगाव पार्कमधील भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात सुरू असलेल्या मतमोजणी दरम्यान टेबल क्रमांक 13 वर एक काउंटिंग मशीन नादुरुस्त असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे गोंधळ सुरू झाला. परिणामी सकाळी 9.30 वाजल्यापासून येथील मतमोजणी थांबली आहे. 

तक्रार असलेले मशीन बाजूला ठेवून मतमोजणी करू, असा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी नीता शिंदे यांनी दिला. परंतु, त्यानंतरही काँग्रेस, वंचितचे कार्यकर्ते आक्रमक राहिले. त्यामुळे येथील मतमोजणी थांबली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी 8.30 वाजल्यापासून या मतदारसंघात फक्त 1 फेरी मोजून झाली असून त्यात भाजपचे सुनील कांबळे 284 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसतर्फे रमेश बागवे, वंचित बहुजन आघाडीकडून लक्ष्मण आरडे, मनसेच्या मनीषा सरोदे, 'एमआयएम'च्या हिना मोमीन यांच्यासह तब्बल 28 उमेदवार रिंगणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com