मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केला : आमदार कुल यांचे प्रतिपादन

मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केला : आमदार कुल यांचे प्रतिपादन

केडगाव : धनगर व मराठा आरक्षणासाठी मी विधानसभेत अनेकदा तारांकित व लक्षवेधी प्रश्न उपस्थित केले. सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले. धनगर समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी व त्याचा अभ्यास करण्यासाठी टाटा संस्थेला काम दिले. धनगर आरक्षणाचे 90 टक्के काम झाले आहे. आरक्षण मिळेपर्यंत आदिवासींना मिळणाऱ्या सवलती लागू करण्यासाठी सरकारने एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती भाजपचे उमेदवार आमदार राहुल कुल यांनी दिली.

कुल यांच्या प्रचारार्थ वरवंड, कडेठाण, हातवळण येथे सभा झाल्या. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे सरचिटणीस तानाजी दिवेकर, नंदू पवार, महेश भागवत, आरपीआयचे नागसेन धेंडे, वसंत साळुंके आदी उपस्थित होते.

कुल म्हणाले, ""बेबी कालव्याच्या संपूर्ण अस्तरीकरणाच्या 109 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अस्तरीकरण झाल्यानंतर पाटसपर्यंतच्या शेतीला पाणी दिले जाईल. नंदीवाले, देऊळवाले अशा भटक्‍या जमातीतील दोन हजार नागरिकांना अल्प पुरावे असताना जातीचे दाखले दिले. कार्यकर्त्यांनी आपला कार्यअहवाल मतदारांना समजून सांगावा. राष्ट्रवादी दहशतीचे राजकारण करू पाहात आहे. हे वरवंडच्या सभेतून दिसले.''

नंदू पवार म्हणाले, ""या तालुक्‍याची मान बारामतीच्या दारात अनेकदा झुकली, याचे वाईट वाटते.''

महेश भागवत म्हणाले, ""मुळशीचे पाणी डोळ्यासमोर ठेवून कुल यांना विधानसभेत पाठवा.''
तानाजी दिवेकर, संजय दिवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच गोरख दिवेकर यांनी प्रास्ताविक केले.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी चौफुला येथे दौंड तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रचाराचा आढावा घेतला. भाजपने स्थानिक निवडणुकीत शिवसेनेला स्थान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. ती कुल यांनी मान्य केली. या वेळी सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र काळे, उपजिल्हा प्रमुख महेश पासलकर, आनंद थोरात, सदानंद लकडे, आनंद पळसे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com