पाणी सोडा अन्यथा मुख्यमंत्र्यांना अडविणार : राहुल जगताप

पाणी सोडा अन्यथा मुख्यमंत्र्यांना अडविणार : राहुल जगताप

श्रीगोंदे (नगर) : कुकडी कालव्यातून सुरु असणारे आवर्तन भाजप व शिवसेना नेत्यांच्या वादातून बंद झाले. श्रीगोंद्यातील शेतकरी पाण्यापासून वंचीत असताना सत्तेत असणाऱ्या नेत्यांचा वाद आता शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे. बंद केलेले आवर्तन तातडीने सुरू कारवे अन्यथा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रीगोंद्यात अडवू अशी टोकाची भूमिका राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी घेतली आहे. त्यांच्या या निर्णयाने खळबळ उडाली आहे. 

श्रीगोंद्याच्या हद्दीत कुकडीचे पाणी अजून व्यवस्थित सुरू झाले नसतानाच काल गुरुवारी रात्री ते बंद झाले. सरकारनामाशी बोलताना जगताप म्हणाले, पुणे जिल्ह्यातील शिवसेना आमदार शरद सोनवणे यांनी याप्रश्नी आक्रमक भूमिका घेत कालवा बंद केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पारनेर येथे कुकडीचे एक कार्यालय सुरु करतानाच पुण्यातील जलसंपदाचे मुख्य कार्यालय नगरला आणण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्न करीत आहेत. या दोन नेत्यांच्या वादाची किनार आवर्तन बंद करण्याला आहे. 

कर्जत व करमाळा तालुक्‍यातील सिंचन झाले त्यासाठी तालुक्‍यातील माजी मंत्र्यासह विखेपाटील व पालकमंत्री राम शिंदे यांनी एकत्रीत प्रयत्न केले. श्रीगोंद्याला एक तर उशिरा पाणी सुरु केले आणि लगेच बंद करण्याची खेळी केली गेली. सत्तेतील दोन नेत्यांचा वाद आमच्या मुळावर येत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. उद्या मुख्यमंत्री फडणवीस श्रीगोंद्यातून दौंडला जाणार आहेत. आज तातडीने कालवा सुरु केला नाही तर आपण हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रस्त्यावर बसून मुख्यमंत्र्यांना अडविणार आहोत. याबाबत नगर व पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना माहिती दिली असून शेतकऱ्यांसाठी कुठलीही किंमत मोजण्यास आम्ही तयार असल्याचे जगताप म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com