राहुल गांधींवरील राम शिंदेंची टीका म्हणजे प्रसिद्धीसाठी, कॉंग्रेसचा आरोप 

 राहुल गांधींवरील राम शिंदेंची टीका म्हणजे प्रसिद्धीसाठी, कॉंग्रेसचा आरोप 

पिंपरीः माजी मंत्री भाजपचे राम शिंदे हे पराभूत झाल्याने नैराश्‍यात गेले आहेत. त्यांचे राजकारण संपूष्टात आल्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी कॉंग्रसचे राहूल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर काल टीका केली,असा पलटवार युवक कॉंग्रेसने आज केला. 

अशी टीका करताना शिंदेंनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत,असा हल्लाबोलही कॉंग्रेसने केला. त्यामुळे शिंदेनी आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला त्यांना देण्यात दिला आहे. 

विचारांना-विचारांनी उत्तर देण्याची क्षमता नसणारे लोक अशी वैयक्तिक स्वरूपाची टिकाटिप्पणी करतात.मूळ मुद्यावरून दिशाभूल करतात. हाच भाजपचा खरा चेहरा पुन्हा एकदा जनतेच्या समोर आला आहे.माणूस जन्माने नाही, तर कर्माने मोठा होतो, ही साधी बाब शिंदे यांना माहीत नसावी, याची कीव येते.केवळ प्रसिध्दीसाठी बड्या व्यक्तींवर टिका करणे हे शिंदेच्या मनोवृत्तीचे दर्शन घडवते, असे प्रत्युत्तर युवक कॉंग्रसने आज दिले. 

शिंदे हे काल शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी राहूल गांधी हे हायब्रीड व्हर्जन ( इंडो- ईटालियन)आहेत,अशी जहरी टीका केली होती. त्याला राहूल गांधींची ब्रीड, त्याग, बलिदान,समर्पणाची असल्याचे उत्तर युवक कॉंग्रेसने आज दिले. रेप इन इंडियाच्या आपल्या वक्तव्यावर माफी मागायला मी सावरकर नाही,असे विधान राहूल गांधीनी केले होते. 

त्याला उत्तर देताना शिंदे यांनी राहूल गांधीच्या जन्माचाच मुद्दा काल उपस्थित केला होता. राहूलजींच्या टीकेवर मुद्याच्या आधारे प्रतीटीका करणे योग्य ठरले असते, असे युवकचे कॉंग्रेसचे म्हणणे पडले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com