राहुल गांधी कडाडले, `मोदी हे अदानी आणि अंबानी यांचे लाउडस्पीकर'

एक-एक करून सर्व उद्योग या देशातील मूठभर 15-20 लोकांच्या स्वाधीन करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. खरे पाहता ते अदानी आणि अंबानी यांचे लाऊडस्पीकर आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी कडाडले, `मोदी हे अदानी आणि अंबानी यांचे लाउडस्पीकर'

नागपूर : एक-एक करून सर्व उद्योग या देशातील मूठभर 15-20 लोकांच्या स्वाधीन करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. खरे पाहता ते अदानी आणि अंबानी यांचे लाऊडस्पीकर आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला. 

यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ वणी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. टीव्ही आणि पेपरमध्ये दररोज त्यांचे फोटो फुकटात नाही येत तर त्यासाठीही मोदी जनतेचा पैसा खर्च करतात. ज्या पध्दतीने हे सरकार काम करत आहे, त्यामुळे येत्या सहा महिन्यात बेरोजगारी दुप्पट होईल, असा दावा राहुल यांनी केला.

जे जनतेचे मुद्दे आहेत, त्यावर मोदी बोलतच नाहीत. तर 370 आणि इतर मुद्यावर बोलतात. या 370 चा महाराष्ट्रात काय संबंध, असा सवालही त्यांनी केला.

भलतेच मुद्दे उपस्थित करून ते जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम करतात. मोजक्या 15-20 उद्योगपती चे 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज या सरकारने माफ केले. सव्वा कोटी रुपयांचा टॅक्सही या सरकारने उद्योगपतींना माफ केल्याचे ते म्हणाले.

भारताची अर्थव्यवस्था सध्या अदानी आणि अंबाणी चालवीत आहे, त्यामुळे या सरकारकडून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे होणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com