राहूल गांधीची नगरसेवकांना साथ 

राहूल गांधीची नगरसेवकांना साथ 

मुंबई ः कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी हे गेल्या पंधरवड्यात मुंबई दौऱ्यावर आले तेव्हा नगरसेवकांनी मनातील खदखद त्यांच्यापुढे मांडली. उमेदवारी देता देता शेवटच्या घटकेला डावलले जाते. निवडणुकीचे एबी फॉर्म शेवटच्या क्षणी दिले जातात. नगरसेवकांची ही कैफियत राहूल यांनी गांभिर्याने घेतली. त्यामुळे सध्या कॉंग्रेसच्या आमदार आणि खासदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नगरसेवकांनी आमदार खासदारांचा गेम केल्याची चर्चा कॉंग्रेसच्या वर्तूूळात आहे. 

गोरेगाव येथील एक्‍झिबिशन सेंटरमध्ये कॉंग्रेसच्या बुथ कमिटीच्या कार्यकर्त्यांना राहूल यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्‍समध्ये एमसीएमध्ये कॉंग्रेसच्या नगरसेवकांशी संवादसाधला.

यावेळी नगरसेवकांनी त्यांच्याकडे थेट कैफियत मांडली. नगरसेवक सुफियन वणू या नगरसेवकाने शेवटच्या घटकेला होणाऱ्या एबी फॉर्मच्या वितरणावर आक्षेप घेतला. एक दोन महिने आधी जर त्याबाबची माहिती दिली तर त्यादृष्टीने मतदार संघात काम करता येईल असे मत त्यांनी मांडले. 

काही नगरसेवक म्हणाले की, एबी फॉर्मचे वितरण तसेच निवडणुकीची तिकीटे आमदार आणि खासदार त्यांच्या मर्जीतील लोकांना शेवटच्या क्षणी वितरित करतात. त्यामुळे नगरसेवकांना शांत बसण्याशिवाय पर्याय नसतो. ही खदखद गेल्या अनेक वर्षांपासूूनची आहे. मात्र यावेळी या तक्रारी थेट पक्षश्रेष्ठींपुढे मांडल्याने त्यांची गंभीर दखल पहिल्यांदाच घेण्यात आली आहे.

राहूल गांधी यांनीही "मै तुम्हारे साथ हूँ' असे सांगत ऐसी शिकायत करनेका मौका नही मिलेगा असे आश्‍वासन दिल्यामुळे पक्षातील आमदार आणि खासदार यांचे धाबे दणाणले आहेत. खरे तर नगरसेवकांनी आमदार आणि खासदार यांचा गेम केल्याची चर्चा कॉंग्रेसच्या वर्तूळात राहूल गांधी यांच्या दौऱ्यानंतर सुरू झाली आहे. 
 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com