rahul gandhi-smruti-irani-madhya-pradesh-election | Sarkarnama

राहुल गांधींनी आरती आणि राम नाम जप करणे, हा भाजपचाच विजय : स्मृती इराणी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

मध्य प्रदेशसह पाच राज्यांमधील निवडणुका आज जाहीर झाल्या आणि लोकसभेच्या रणसंग्रामाची पूर्वपरिक्षा सुरू झाली. त्यात भाजप आणि कॉंग्रेस हे प्रमुख प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांवर आक्रमकपणे वार करायला सुरवात केली आहे. त्याची सुरवात आज मध्य प्रदेशच्या रणांगणात झाली आहे.

पुणे : मध्य प्रदेशसह पाच राज्यांमधील निवडणुका आज जाहीर झाल्या आणि लोकसभेच्या रणसंग्रामाची पूर्वपरिक्षा सुरू झाली. त्यात भाजप आणि कॉंग्रेस हे प्रमुख प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांवर आक्रमकपणे वार करायला सुरवात केली आहे. त्याची सुरवात आज मध्य प्रदेशच्या रणांगणात झाली आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्य प्रदेशमधील जबलपूरजवळ नर्मदा पूजा केली. तेथे त्यांनी नर्मदेची आरतीही केली. ही आरती करताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि तरुण नेते ज्योतिरादित्य सिंधिया हेही उपस्थित होते. सर्वांनी मनोभावे आरती करीत नर्मदेची पूजा केली.    

कॉंग्रेसने नर्मदेची आरती आणि पूजा केलेली पाहून केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी थेट राहुल गांधी यांच्यावरच तोफ डागली. 

राहुल गांधी यांनी पूजा करणे हे सुद्धा भाजपचा विजय असल्याचे सांगताना स्मृती इराणींनी `हिंदू दहशतवादाची भिती वाटणाऱ्या आणि प्रभू रामचंद्र कधी अस्तित्वात नव्हतेच, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात देणाऱ्या राहुल गांधींनी आज आरती आणि राम नामाचा जप करणे हा भाजपचा विजय आहे,' असे `एएनआय'ला सांगितले. 

खोटे आरोप करणाऱ्या राहुल गांधींना आज राजकीय पापांतून मुक्तीसाठी मंदिरांमध्ये जावे लागले. बहुसंख्य समाजाकडे आजपर्यंत त्यांनी तुच्छतेने पाहिले. त्या लोकांना आपलेसे करण्यासाठी मंदिरात जाण्याची त्यांनी खेळी केली आहे, असेही त्यांनी राहूल गांधींना दूषणे देत सुनावले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख