Rahul Gandhi runs away from income tax officers : Smriti Irani | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

राहुल गांधी प्राप्तिकर अधिकाऱ्यापासून ते मैलभर दूर पळतात : स्मृती इराणी 

पीटीआय
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली :  कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची 2011-12मधील कर मूल्यांकनाची फाइल पुन्हा उघडण्याचा निर्णय प्राप्तिकर विभागाने घेतला आहे. या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली आहे.

यामुद्द्यावरूनराहुल गांधी यांना लक्ष्य करीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारण्यासाठी ते पुढे येतात, मात्र प्राप्तिकर अधिकाऱ्यापासून ते मैलभर दूर पळतात,'' अशी टीका मंगळवारी केली.

हे प्रकरण ' नॅशनल हेरॉल्ड' वृत्तपत्राशी संबंधित असून, सोनिया व राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. 10) फेटाळून लावली.

यासंबंधात भाजप कार्यालयात बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, "राहुल गांधी यांनी अनेक प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागतील. न्यायालयाच्या निर्णयाने सर्वांत जुन्या असलेल्या कॉंग्रेसमध्ये रुजलेल्या भ्रष्टाचाराचे दर्शन होते. प्राप्तिकराच्या नोटिशीला कोणीही भारतीय विरोध करू शकत नाही, राहुल गांधी मात्र त्यापासून दूर पळत आहेत.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख