राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली .या दोघातील गेल्या दोनदिवसातील ही दुसरी भेट आहे .
Sharad-Pawar-Rahul-Gadhi
Sharad-Pawar-Rahul-Gadhi

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली .या दोघातील गेल्या दोन  दिवसातील  ही दुसरी भेट आहे .

काल मंगळवारी रात्री सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाच्यावेळी या दोन नेत्यांमध्ये भेट आणि चर्चा झाली होती . त्यानंतर आज सायंकाळी पुन्हा राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे . या भेटीत दोघांत  सविस्तर चर्चा झाली आहे  असे समजते . 


 विरोधकांना दिलासा देणाऱ्या उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेसने एकजुटीच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. तिसऱ्या आघाडीच्या झेंड्याखाली कॉंग्रेसेतर पक्षांनी एकत्र येण्याआधी त्यांना कॉंग्रेससोबत आणण्यासाठी राहुल गांधींनी औपचारिक संवाद आरंभल्याचे समजते. त्यासाठी   राहुल यांनी वरिष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली, असे समजते . 

येत्या  28 मार्चला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनाही ते भेटणार असल्याचे कळते.

सोनिया गांधींनी काल (ता. 13) मेजवानीच्या निमित्ताने भाजपविरोधातील समविचारी पक्षांशी अनौपचारिक बोलणी केली होती. यात संसद अधिवेशन आणि सरकारचा कारभार यावर आडवळणाने चर्चा झाली; परंतु 2019 च्या  लोकसभा निवडणुकीसाठी एकजुटीची गरज त्यामागे असल्याचे बोलले जाते.

 आज खुद्द राहुल गांधी यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांशी संसदेत बोलताना, या एकजुटीसाठी सर्व नेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले, असे सूत्रांकडून समजते. कॉंग्रेसचे महाधिवेशन, तसेच संघटनात्मक कामकाज आटोपून अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरू करणार असल्याचेही राहुल यांनी या वेळी सांगितल्याचे कळते. सायंकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन राहुल गांधींनी सविस्तर चर्चा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com