राहुल गांधी जेथे  जातात तेथे काँग्रेसचा  पराभव होतो : स्मृती इराणी - Rahul Gandhi is loser for congress party : Smriti irani | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधी जेथे  जातात तेथे काँग्रेसचा  पराभव होतो : स्मृती इराणी

सरकारनामा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

मुंबई :  कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ज्या ज्या ठिकाणी जातात, त्या त्या ठिकाणी कॉंग्रेस पक्षाचा पराभव होतो, अशी टीका केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज येथे केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी जेथे जेथे जातात तेथे तेथे त्यांच्या पक्षाचा पराभव होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलनाच होउ शकत नाही.

या वेळी इराणी यांनी मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी साडेसात हजार कोटी एवढी नुकसानभरपाई मिळाली.

फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना 21हजार 950 कोटी एवढी भरपाई पीक विम्यापोटी मिळाली. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना 25 हजार कोटींची कर्जमाफी दिली. 

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात दीड लाख कोटी एवढी गुंतवणूक करण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत एकही दंगल झाली नाही, एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. फडणवीस सरकारच्या काळात जनतेने सुखी, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र अनुभवला, असेही इराणी या वेळी म्हणाल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख