पवारांच्या  निवासस्थानी  केजरीवाल आणि राहुल यांच्यात प्रथमच चर्चा 

एकमेकांशी फटकून राहणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रथमच या निमित्ताने एकमेकांशी संवाद साधल्याचे कळते.
pawar gandhi kejriwal.
pawar gandhi kejriwal.

नवी दिल्ली : संसद अधिवेशन संपताच लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी विरोधक पुन्हा एकत्र आले आहेत. याअंतर्गत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक रंगली. एकमेकांशी फटकून राहणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रथमच या निमित्ताने एकमेकांशी संवाद साधल्याचे कळते. 

शरद पवार यांच्या निवासस्थानी तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुक अब्दुल्ला, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलुगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली. राहुल गांधीही उशिरा या बैठकीत सहभागी झाले होते. 


तत्पूर्वी, आज दुपारीच महाराष्ट्रातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीसंदर्भात शरद पवार आणि राहुल गांधी यांची दीर्घकाळ चर्चा झाली होती. या वेळी कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे, सुप्रिया सुळे, के. सी. वेणुगोपाल, प्रफुल्ल पटेल हजर होते. यादरम्यान जागावाटपात शिल्लक राहिलेल्या मतदारसंघांसंदर्भात; तसेच संभाव्य उमेदवारांबाबतही चर्चा झाल्याचे कळते. या बैठकीनंतर लगेचच रात्री पुन्हा एकदा पवार आणि राहुल यांची अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय राजकारण, राज्यनिहाय आघाडी या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचेही सांगितले जाते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com