Rahul Gandhi has no chance in politics: Ramchandra Guha | Sarkarnama

राहुल गांधींना राजकारणात संधी नाही : रामचंद्र गुहा

वृत्तसंस्था
शनिवार, 18 जानेवारी 2020

कोझिकोड : ""आत्मनिर्भर आणि कठोर परिश्रम करणाऱ्या नरेंद्र मोदींसमोर पाचव्या पिढीचे वंशज असलेल्या राहुल गांधी यांना भारतीय राजकारणात कोणतीही संधी नाही. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीत निवडून देऊन केरळने विनाशकारी गोष्ट केली आहे,'' असे टीका इतिहासाचे अभ्यासक रामचंद्र गुहा यांनी केली. 

कोझिकोड : ""आत्मनिर्भर आणि कठोर परिश्रम करणाऱ्या नरेंद्र मोदींसमोर पाचव्या पिढीचे वंशज असलेल्या राहुल गांधी यांना भारतीय राजकारणात कोणतीही संधी नाही. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीत निवडून देऊन केरळने विनाशकारी गोष्ट केली आहे,'' असे टीका इतिहासाचे अभ्यासक रामचंद्र गुहा यांनी केली. 

केरळ साहित्य महोत्सवात "देशभक्तीविरोधात फाजिल देशाभिमान' या विषयावरील व्याख्यानात गुहा यांनी शुक्रवारी राहुल गांधा यांच्यावर कडाडून टीका केली. वेगवेगळ्या मुद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर कायम टीकास्त्र सोडणाऱ्या गुहा यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

 ते म्हणाले, ""मी व्यक्तिशः राहुल गांधी यांच्या विरोधात नाही. ते खूप सभ्य व आदरणीय आहेत. पण युवा भारताला पाचव्या पिढीतील हा वंशज नको आहे. जर तुम्ही मल्याळी नागरिकांनी 2024 मध्ये राहुल गांधी यांना निवडून दिले तर तुम्ही मोदी यांनाच लाभ मिळवून देणार आहात. स्वातंत्र्य संग्रामातील प्रभावशाली पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे दयनीय कौटुंबिक उद्योगात होणे ही वर्चस्ववादी हिंदुत्व आणि भारतातील अंध देशाभिमानाची कारणे आहेत.'' 

व्याख्यानाला बहुसंख्येने उपस्थित केरळच्या श्रोत्यांना उद्देशून गुहा म्हणाले, की तुम्ही भारतासाठी अनेक उत्तम गोष्टी केल्या आहेत. पण यात एक भीषण गोष्ट तुम्ही केली ती म्हणजे राहुल गांधी यांना तुम्ही संसदेत पाठविले. नरेंद्र मोदी यांचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे ते राहुल गांधी नाहीत. ते आत्मनिर्भर आहेत. त्यांनी 15 वर्षे राज्य चालविले आहे. त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे. ते अत्यंत कामसू असून त्यांनी युरोपमध्ये कधी सुटी घालविली नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख