पंधरा मिनीटात एक हजार पायऱ्या चढून राहुलनी घेतले चामुंडा देवीचे दर्शन  - rahul gandhi gujarat tour | Politics Marathi News - Sarkarnama

पंधरा मिनीटात एक हजार पायऱ्या चढून राहुलनी घेतले चामुंडा देवीचे दर्शन 

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

अहमदाबाद : पंधरा मिनिटात एक हजार पायऱ्या चढून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमधील चामुंडा देवीचे दर्शन घेतले. सुरेंद्रनगर जिल्ह्यातील चोटीला येथील एका डोंगणावर हे प्रसिद्ध मंदीर आहे. राहुल हे सध्या गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी चार मंदिरात देवींचे दर्शन घेतले आहे. त्यांच्याबरोबर चालताना कॉंग्रेस नेत्यांना अक्षरश: घाम फुटत होता. 

राहुल गांधी यांच्या फिटनेसबाबत अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. ते लोकांमध्ये मिसळताना किंवा कार्यक्रमस्थळी जाताना झपझप चालत असतात. त्यांच्यासोबत असलेल्या आणि साठी ओलांडलेल्या नेत्यांची मात्र दमछाक होताना दिसत होती. मंदिरातील दर्शन असो किंवा रॅलीत चालणे असो न थकता आपला उत्साह राहुल टिकवून असताता. 

दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सुरेंद्रनगरमधील महिलांशीही त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना कॉंग्रेस पक्ष आणि महिला आरक्षणाविषयी प्रश्‍न विचारण्यात आले. महिलांना आरक्षण मिळालेच पाहिजे हीच कॉंग्रेसची प्रथमपासूनची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र राहुल यांनीही महिलांनाही काही प्रतिप्रश्‍न केले. ते म्हणाले, की जर गुजरातमध्ये महिला निवडून आल्या तर त्या पती सांगतील त्या प्रमाणे कारभार करणार का ? लोकसभा, राज्यसभेतही आरक्षण मिळाल्यानंतर काय तुम्ही पतींना प्रत्येकवेळी विचारणार का ? त्यांचा सल्ला घेणार का ? त्यावर उपस्थित महिला म्हणाल्या, "" नाही, आम्हीच आमचा निर्णय घेऊ ? पतींना अजिबात विचारणार नाही. 

दरम्यान, राहुल यांनी गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशातील जनतेला जो त्रास सहन करावा लागत आहे त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख