आजचा वाढदिवस : राहुल गांधी - अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस. - rahul gandhi congres president | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : राहुल गांधी - अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस.

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 19 जून 2018

गांधी घराण्याची परंपरा लाभलेले राहुल गांधी हे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या त्यांच्या मातोश्री आहेत. प्रियांका गांधी बहीण आहेत. लहान वयातच ते राजकारणात आले. राहुल गांधींनी 2004 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून ते विजयी झाले. त्यानंतर 2009 आणि 2014 मध्येही ते अमेठी मतदारसंघातून विजयी झाले. 2004 व 2009 मध्ये कॉंग्रेसची सत्ता देशात होती. 2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसला 206 जागा मिळाल्या होत्या.

गांधी घराण्याची परंपरा लाभलेले राहुल गांधी हे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या त्यांच्या मातोश्री आहेत. प्रियांका गांधी बहीण आहेत. लहान वयातच ते राजकारणात आले. राहुल गांधींनी 2004 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून ते विजयी झाले. त्यानंतर 2009 आणि 2014 मध्येही ते अमेठी मतदारसंघातून विजयी झाले. 2004 व 2009 मध्ये कॉंग्रेसची सत्ता देशात होती. 2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसला 206 जागा मिळाल्या होत्या. अनेक नेत्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप व नंतर देशभर नरेंद्र मोदींच्या झंझावाताने कॉंग्रेस कमकुवत झाली. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत कॉंग्रेसला फक्त 44 जागा जिंकता आल्या. नरेंद्र मोदींचा प्रभाव कमी करण्यासाठी राहुल गांधी यांनी खूप प्रयत्न केले, पंजाब, कर्नाटक, गुजराथ या तीन राज्यात कॉंग्रेसची परिस्थिती सुधारली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख