डोकलाममधील चीनच्या रस्त्यांबाबत  मोदींनी खुलासा करावा : राहुल 

rahul-gandhi
rahul-gandhi

नवी दिल्ली     : " डोकलाम परिसरात चीनकडून सुरू करण्यात आलेल्या रस्त्यांच्या बांधणीसंदर्भातील अहवालाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिम्मत असेल तर  खुलासा करावा, "असे आव्हान कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. 

चीनने सैन्याची संख्या वाढवून वादग्रस्त भागापासून 12 किलोमीटर अंतरावर सुरू केलेल्या रस्त्याच्या कामानंतर राहुल यांनी ट्विट केले आहे. चीनच्या रस्ते बांधणीबाबतच्या बातम्यांचा हवाला देऊन त्यांनी हे ट्विट केले आहे. सुमारे 500 सैनिकांच्या संरक्षणात चीनने डोकलाममध्ये रस्ते बांधण्यास सुरवात केली आहे. गेल्या 16 जूनपासून चीन आणि भारताच्या संरक्षण दलांनी वादग्रस्त भागातील रहदारी रोखून धरल्याने तणावाची स्थिती होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com