पंतप्रधान मोदींकडून राहुल गांधींना शुभेच्छा ! 

पंतप्रधान मोदींकडून राहुल गांधींना शुभेच्छा ! 

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावर राहुल यांनी "तुम्ही दाखवलेल्या प्रेमाने भारावून गेलो आहे,' असे ट्विट करीत सर्वांना धन्यवाद दिले. 

मोदी यांनी राहुल गांधी यांना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. "राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. देवाने चांगले आरोग्य व दीर्घायुष्य द्यावे,' असे ट्विट मोदी यांनी केले आहे. त्याला उत्तर देताना राहुल गांधी यांनी "शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद नरेंद्र मोदीजी.

मला तुमचे कौतुक वाटते,' असे ट्विट केले आहे. राहुल गांधी यांची बहीण प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, गुलाम नबी आझाद, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत या कॉंग्रेस नेत्यांनी आज सकाळी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. राहुल यांनी सर्वांना धन्यवाद देत ट्विटरवर कॉंग्रेस नेत्यांसह छायाचित्रही पोस्ट केले आहे. 

राहुल गांधी यांना शुभेच्छा देण्यासाठी कॉंग्रेसच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. या वेळी राहुल यांनी त्यांना व माध्यमांच्या प्रतिनिधींना लाडू वाटले. "राहुल गांधी यांच्या वाढदिनी कॉंग्रेसने वृक्षारोपण मोहीम सुरू केली असल्याची माहिती शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्‌विटमध्ये दिली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी गांधी यांना शुभेच्छा दिल्या. 

कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी सोशल मीडियावर #आय एम राहुल गांधी आणि #हॅपी बर्थडे राहुल गांधी हा हॅशटॅक ट्रेंड केला. कॉंग्रेसने ट्विटर अकाउंटवर राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ शेअर केला. त्याचे शीर्षक "पॉंच पल जब उन्होंने हर जगह भारतीयों को प्रेरित किया' असे होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com