rahul gandhi bhivandi court | Sarkarnama

राहुल गांधींसाठी भिवंडी न्यायालयात मोठी गर्दी 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 डिसेंबर 2018

भिवंडी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बदनामी प्रकरणी अखिल भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी येणार असल्याने आज भिवंडी न्यायालय परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती मात्र, ते येणार नसल्याचे समजताच नागरिकांनी पाय काढता घेतला. 

संघाच्या बदनामीप्रकरणी भिवंडी न्यायालयात खटला सुरू असून आज दुपारी या खटल्याची सुनावणी होती. मात्र गांधी पक्षाच्या कामकाजात व्यस्त असल्याने तसेच याचिकाकर्ते राजेश कुंटे हे कामकाजानिमित्त बाहेरगांवी असल्याने न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने या प्रकरणातील सुनावणीची 16 मार्च 2019 होणार आहे. 

लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडी तालुक्‍यातील सोनाळे गांव येथील क्रीडांगणावर 6 मार्च 2014 रोजी झालेल्या कॉंग्रेसच्या सभेत गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या संघाने घडवून आणल्याचा खळबळ जनक आरोप केला होता. या आरोपाने संघाची बदनामी झाल्याचा आरोप करीत संघाचे भिवंडी कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात 19 मार्च 2014 रोजी याचिका दाखल केली होती. 

भिवंडी न्यायालयात न्यायाधीश ए. ए. शेख यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. मात्र, याचिकाकर्ता पक्षाकडून कोणीही हजर नसल्याने पुढील सुनावणी आता 16 मार्चरोजी होणार असल्याची माहित राहुल गांधी यांचे वकील नाना अय्यर यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख