राहुल गांधींनी अशोक गेहलोत, सचिन पायलट यांची भेटही टाळली

राजीनामा मागे घेण्याबाबत राहुल गांधींकडून काहीही संकेत मिळत नसल्याने कॉंग्रेसजनांची तगमग वाढली आहे. राजीनाम्यानंतर नेत्यांना टाळणाऱ्या राहुल यांनी पक्षाच्या दैनंदिन कामकाजापासून फटकून राहणे पसंत केले. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आणि राहुल यांच्या भेटीवरून कालगोंधळ उडाल्याचे दिसून आले.
राहुल गांधींनी अशोक गेहलोत, सचिन पायलट यांची भेटही टाळली

नवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्याबाबत राहुल गांधींकडून काहीही संकेत मिळत नसल्याने कॉंग्रेसजनांची तगमग वाढली आहे. राजीनाम्यानंतर नेत्यांना टाळणाऱ्या राहुल यांनी पक्षाच्या दैनंदिन कामकाजापासून फटकून राहणे पसंत केले. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आणि राहुल यांच्या भेटीवरून काल गोंधळ उडाल्याचे दिसून आले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना राहुल यांनी भेट नाकारल्याची चर्चा रंगली होती. याआधी डॉ. मनमोहनसिंग, अहमद पटेल, ए. के. ऍन्टनी, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल या वरिष्ठ नेत्यांनाच राहुल भेटल्याचेही कळते. त्या पार्श्‍वभूमीवर काल गेहलोत आणि पायलट दोन्हीही नेत्यांनी राहुल गांधींची भेट घेऊन राजस्थानात पक्षाची परिस्थितीची नेतृत्वाच्या कानावर चर्चा केल्याच्या बातम्या सकाळपासून सुरू होत्या. राहुल यांच्या 12 तुघलक लेन या निवासस्थानी दोन्हीही नेते पोचले. तत्पूर्वी राहुल यांना सरचिटणीस प्रियांका गांधी, संघटना सरचिटणीस वेणुगोपाल, मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला भेटले. परंतु, गेहलोत आणि पायलट हे निवासस्थानी पोचूनही त्यांची राहुल गांधींशी भेट होऊ शकली नाही. त्यांना केवळ प्रियांका गांधींची भेट घेऊन परतावे लागल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे, कॉंग्रेसने आजच्या भेटीला मोघम शब्दांत दुजोरा दिला. परंतु, राहुल यांनी अध्यक्ष या नात्याने नेहमीप्रमाणे कामकाज सुरू केले काय यावर सोईस्कर मौन पाळले. पक्ष प्रवक्ते पवन खेडा यांनी राहुल गांधींच्या राजीनाम्यावर बोलण्याचे टाळले. राहुल यांचा राजीनामा नाकारणारा ठराव कार्यकारिणीने केला असून मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाची भूमिकाही सविस्तरपणे मांडली आहे. त्यामुळे यावर अधिक बोलण्याची आवश्‍यकता नाही, असा पवित्रा खेडा यांनी घेतला. राहुल गांधी आज अशोक गेहलोत आणि पायलट यांना भेटल्याबद्दल विचारले असता "ही वस्तुस्थिती आहे,' असा मोघम शब्दांत त्यांनी दुजोरा दिला.

पक्षनेतेपद स्वीकारणार?
राजीनाम्यावर ठाम असलेल्या राहुल गांधींनी संसदेमध्ये पक्षनेते पदाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याची माहिती पुढे आली आहे. यावरही कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्यांनी पक्षाची भूमिका गुलदस्तात ठेवली. पवन खेडा म्हणाले, की याबाबतचा निर्णय झाल्यानंतर माध्यमांना कळविले जाईल. पक्षाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सध्याच्या परिस्थितीत याबाबतची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.

राजकीय आघाडीवर...
- समजूत काढण्यासाठी प्रियांका वद्रा, रणदीप सुरजेवाला यांचे प्रयत्न.
- सध्याच्या स्थितीतून राहुलच कॉंग्रेसला बाहेर काढतील ः शशी थरूर
- पक्षाध्यक्षपदी राहुल गांधी यांनीच राहावे ः वीरप्पा मोईली
- राहुल यांनी राजीनामा देऊ नये ः एम. के. स्टॅलिन 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com