rahul gandhi attack modi | Sarkarnama

मोदी यांची मानसिकता दलितविरोधीः राहुल गांधी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानसिकता दलितविरोधी असल्याची टीका करीत जेथे सर्वांना सामावून घेतले जाईल, अशा भारतासाठी आपला पक्ष लढा देईल, अशी ग्वाही कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी दिली.
 
अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 (ऍट्रॉसिटी) हा मवाळ करण्यासंबंधीच्या विरोधात जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात राहुल गांधी यांनी आज सहभाग घेतला.

या वेळी बोलताना ते म्हणाले, की "ऍट्रॉसिटी' कायदा हा कॉंग्रेसने आणला होता. सर्वांना बरोबर घेऊन पक्ष त्याचे रक्षण करेल. देशातील ज्या- ज्या राज्यांत भाजपचे सरकार सत्तेवर आहे, तेथे दलितांना थेटपणे मारहाण केली जात आहे.

""आम्हाला असा भारत नको आहे. जेथे सर्वांना जागा असेल, असा भारत आम्हाला हवा आहे. तेथे दलित, गरीब, आदिवासी व अल्पसंख्याक असे सर्व जण प्रगती करतील, अशा भारतासाठी आम्ही लढा देऊ,'' असेही त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख