मोदींच्या "लाडक्‍या'ने मल्ल्याला मदत केली, राहुल यांचा आरोप

 मोदींच्या "लाडक्‍या'ने मल्ल्याला मदत केली, राहुल यांचा आरोप

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "लाडक्‍या'ने फरार उद्योगपती विजय मल्ल्याविरोधातील "लुक आऊट' नोटीस कमकुवत केल्याने त्याला देशाबाहेर पळून जाणे सोपे झाले, असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. राहुल यांच्या आरोपामुळे मल्ल्याप्रकरणावरून निर्माण झालेला राजकीय वाद शमण्याची चिन्हे अद्यापही दूरच असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

राहुल यांनी आज ट्‌विटरवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. "गुजरात केडरचे सीबीआयचे सहसंचालक अधिकारी ए. के. शर्मा यांनी मल्ल्याविरोधातील लुक आऊट नोटीस कमकुवत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याच अधिकाऱ्याने फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांनाही पळून जाण्यात मदत केली,' असे राहुल यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे. 

भाजपने सादर केली जेटलींची डायरी 
अरुण जेटली आणि विजय मल्ल्या यांची भेट झाली नसल्याचे सिद्ध करण्यासाठी भाजपने आज "त्या' दिवसातील घटनांची नोंद असलेली जेटली यांची डायरीच प्रसिद्ध केली. कॉंग्रेस नेते पी. एल. पुनिया यांनी जेटली आणि मल्ल्या यांच्यात संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बराच वेळ चर्चा झाल्याचा दावा केला आहे. मात्र जेटली त्या दिवशी इतका वेळ संसदेत नव्हतेच, असे स्पष्टीकरण आज भाजपने दिले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com