rahul gandhi and rss | Sarkarnama

राहुल गांधी यांना संघाचे निमंत्रण नाही ...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दिल्लीत आयोजित "भविष्य का भारत' कार्यक्रमासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रित करण्याची चर्चा आहे. या संदर्भात अधिकृतपणे निमंत्रण दिलेले नसल्याचे स्पष्टीकरण रा. स्व. संघातर्फे दिले आहे. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रा. स्व. संघाची तुलना इजिप्तमधील "मुस्लिम ब्रदरहूड' या सुन्नी दहशतवादी संघटनेशी केल्यापासून वाद उत्पन्न झालाय. भाजपने या वक्तव्यावर राहुल गांधींकडून माफी मागितली आहे. या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी खरेच रा. स्व. संघाच्या व्यासपीठावर जाणार काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

रा. स्व. संघातर्फे येत्या 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान दिल्लीत " भविष्य का भारत ः रा. स्व. संघाचा दृष्टीकोण' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राहणार आहेत. या चर्चासत्रात देशातील बुद्धीजीवींना निमंत्रित केले जाणार आहे. या चर्चासत्रांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. या कार्यक्रमाला कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांनाही निमंत्रित करण्याची शक्‍यता आहे. 
या संदर्भात "सरकारनामा'शी बोलताना रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे म्हणाले, रा. स्व. संघातर्फे हा तीन दिवसीय कार्यक्रम दिल्लीतील विज्ञान भवनात होणार आहे. भारत आज जगात एक अग्रणी शक्ती म्हणून पुढे येत आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर संघाचे विचार जाणण्यासाठी देशातील प्रबुद्ध नागरिक उत्सुक आहेत. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

यात देशातील बुद्धीजीवींना व प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रित केले जाणार आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत या संदर्भात विचार व्यक्त करतील. या कार्यक्रमाला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना बोलाविण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नसल्याचे सांबरे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपुरात रा. स्व. संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. त्यावेळी कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख