rahul gandhi and congress | Sarkarnama

कॉंग्रेसचे कार्यकर्ते बब्बरशेर - राहुल गांधी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे कार्यकर्ते बब्बर शेर आहेत त्यांनी परिश्रम घेऊन पक्षाला विजय मिळवून दिला आहे अशा शब्दात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांचे आज कौतुक केले. पक्षाला तीन राज्यात मिळालेल्या विजयानंतर घेतलेल्या विशेष पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. 

एक प्रश्‍नाच्या उत्तरात राहुल गांधी पुढे म्हणाले येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करू परंतु भाजपमुक्त देश अशी आमची भूमिका नाही. शेतकरी, तरुणांना रोजगार आणि भ्रष्टाचार हे तीन मुद्दे आज महत्वाचे आहेत. देशाचा आर्थिक कणा मोडलेला आहे असेही ते म्हणाले. देशातले अनेक प्रश्‍न सोडवण्याची मोदी यांना संधी होती ती संधी त्यांनी गमावली असेही मत त्यांनी व्यक्त केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख