rahul gandhi and amit shaha | Sarkarnama

राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी - अमित शहा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : राफेल विमानाच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचे आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी देशाची आणि सैन्याची माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली. राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करून ते म्हणाले राहुल गांधी यांनी बालिश आरोप करणे थांबवावे असेही त्यांनी सांगितले. 
राफेल करारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत प्रशांत भूषण, यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

न्यायालयाने या आरोपात तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला असून रिलायन्सला या व्यवहारात सहभागी करून घेण्यातही काही चुकीचे घडले नसल्याचे स्पष्ट केले आहे. या निकालानंतर शहा यांनी विशेष पत्रकारपरिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी कुठल्या पुराव्याच्या आधारे मोदी सरकारवर आरोप केले ते त्यांनी सांगावे असेही शहा यांनी म्हटले आहे. राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षाला संसदेत या विषयावर चर्चा नको आहे त्यांना फक्त या विषयावर राजाकरण करायचे आहे असा आरोपही शहा यांनी केला. न्यायालयाच्या निर्णयाबद्दल कॉंग्रेस पक्ष आज दुपारी 4 वाजता पत्रकारपरिषद घेणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख