आजचा वाढदिवस : आमदार राहुल बोंद्रे चिखली (बुलडाणा)  - rahul bondre mla birthday 8may | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार राहुल बोंद्रे चिखली (बुलडाणा) 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 मे 2018

बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात आक्रमक व राजकीय डावपेचात माहिर युवा नेतृत्व म्हणून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांची राजकीय पटलावर ओळख आहे. चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिलेले वडील सिद्धविनायक बोंद्रे यांच्याकडून समाजकारण आणि राजकारणाचे धडे राहुल बोंद्रे यांनी गिरविले. सन 2000 मध्ये चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाल्यावर त्यांनी शहर विकासाच्या अनेक संकल्पना मांडत त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. 2004 मध्ये त्यांनी विधानसभा लढविली. मात्र, थोड्या फरकाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी पताका फडकावीत त्यांनी विधानसभा गाठली.

बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात आक्रमक व राजकीय डावपेचात माहिर युवा नेतृत्व म्हणून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांची राजकीय पटलावर ओळख आहे. चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिलेले वडील सिद्धविनायक बोंद्रे यांच्याकडून समाजकारण आणि राजकारणाचे धडे राहुल बोंद्रे यांनी गिरविले. सन 2000 मध्ये चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाल्यावर त्यांनी शहर विकासाच्या अनेक संकल्पना मांडत त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. 2004 मध्ये त्यांनी विधानसभा लढविली. मात्र, थोड्या फरकाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी पताका फडकावीत त्यांनी विधानसभा गाठली. मतदारसंघात केलेली विकास कामे आणि जनसंपर्काच्या भरवशावर त्यांनी पुन्हा 2014 मध्ये विजयी मिळविला. मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष असलेले राहुल बोंद्रे यांचा सहकार क्षेत्रात चांगलाच दबदबा आहे. यासोबत केजी टू पीजी शिक्षण संस्था काढून त्यांनी शहरासह ग्रामीण भागात अनेक शैक्षणिक संस्थांचे जाळे विणले आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख