तमाशाने कोणी बिघडत नाही आणि कीर्तनाने कोणी सुधारत नाही!

कीर्तनकार पुरूषोत्तम पाटील हे इंदोरीकर यांचे उघडपणे समर्थन करतात. इंदोरीकर यांनी तमाशाचा प्रेक्षक कीर्तनाकडे आणला, अशी त्यांची मांडणी आहे.
raghuvir khedkar
raghuvir khedkar

पुणे : "तमाशा वाईट नाही. तमाशाला बदनाम करू नका," असे आवाहन प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी केलं आहे.

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या 'त्या' विधानानंतर 'इंदोरीकर यांनी तमाशाला जाणारा माणूस कीर्तनाकडे आणला', अशी मांडणी त्यांचे समर्थक करत होते. त्यावर खेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
"तमाशाला साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे. तमाशा ही एक लोककला आहे. या कलेकडे शहरी लोक चुकीच्या अर्थाने बघतात पण ग्रामीण लोकांना तमाशा आवडतो. त्यांनीच या केलेला बळ दिले आहे."असे खेडकर यांनी म्हटले आहे.

"तमाशाला तुच्छ लेखणे चुकीचे आहे. तमाशाच्या वगनाट्यातून लोकांच्या हिताचे विचार देण्याचे काम आम्ही तमाशा कलावंत करत आहोत. तमाशाने कोणी बिघडत नाही आणि कीर्तनाने कोणी सुधारत नाही ही म्हण ग्रामीण भागात सर्रास वापरली जाते. किर्तन ऐकायला जाणारे लोक तमाशाला येतात. कीर्तनात कीर्तनात भक्ती शिकवली जाते तर तमाशा दुःख विसरायला लावतो" असेही खेडकर यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com